मुंबई: आगामी बहुचर्चित ‘लॉर्ड ऑफ रिंग्ज‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजच्या पहिल्या भागाच्या निर्मितीसाठी तब्बल ४६५ दशलक्ष डॉलर, अर्थात ३ हजार ४०८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्यामुळे ओटीटीच्या विश्वातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी अन् प्रचंड महागडी सीरिज असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान आजवरची सर्वाधिक लोकप्रिय मालिका असलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन’ पेक्षाही ‘द लॉर्ड ऑफ रिंग्ज’ अधिक महागडी वेब सीरिज ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन’च्या एका भागासाठी जवळपास शंभर दशलक्ष डॉलरचा खर्च करण्यात आला होता. वर्ल्ड ऑफ रिंग्जच्या पहिल्या सीझनच्या खर्चाच्या चारपटीने ही रक्कम कमी आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता लागून राहिली आहे.
- Advertisement -