Home ताज्या बातम्या हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं थोपवली करोनाची दुसरी लाट

हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं थोपवली करोनाची दुसरी लाट

0
हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं थोपवली करोनाची दुसरी लाट

हायलाइट्स:

  • मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येतेय
  • धारावी भागात आढळले करोनाचे फक्त दोन नवे रुग्ण
  • करोनाच्या दुसऱ्या लाटेतही धारावीनं करुन दाखवलं

मुंबईः मुंबईत करोनाचा जोर ओसरत असताना धारावीतूनही सकारात्मक बातमी समोर येत आहे. करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं करोनाची दुसरी लाट मात्र थोपवून धरली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत पहिल्या लाटेच्या सुरुवातीला करोनानं थैमान घातलं होतं. दाटीवाटीची वस्ती आणि सोशल डिस्टनसिंग पाळण्यात येणाऱ्या अडचणींमुळं करोनाचा उद्रेक झाला होता. मात्र, नंतरच्या काळात पालिकेच्या उपाययोजनांमुळं करोना नियंत्रणात आणण्यात यश आलं होतं. त्यानंतर मुंबईत करोनाच्या दुसऱ्या प्रादुर्भाव वाढल्यानंतर धारावीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या दुसऱ्या लाटेतही करोनाला रोखण्यात धारावीला यश आलं आहे.

मुंबईत विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता; पुढचे तीन तास महत्त्वाचे

रविवारी धारावीत फक्त २ रुग्ण आढळले आहेत. तर, सध्या धारावीत एकूण ६ हजार ८३५ रुग्ण आहेत. ६ हजार ४५६ रुग्णांनी करोनावर मात केली असून सध्या फक्त २० अॅक्टिव्ह रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. दादरमध्ये रविवारी ८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या ९ हजार ४८७वर पोहोचली आहे. माहिममध्ये १२ नवीन रुग्ण सापडले असून सध्या २०१ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

‘ट्विटरचे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले, कारण…’

मुंबईत ७८६ नवे रुग्ण

मुंबई महापालिकेच्या हद्दीत रविवारी ७८६ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या सात लाख १० हजार ६४३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आजतागायत करोनामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ९७१ इतकी झाली आहे.

वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू

Source link