Home मनोरंजन हॉटेलमध्ये उर्वशी रौतेलाकडून झाली मोठी चूक, सोशल मीडियावर हात जोडून मागितली माफी

हॉटेलमध्ये उर्वशी रौतेलाकडून झाली मोठी चूक, सोशल मीडियावर हात जोडून मागितली माफी

0
हॉटेलमध्ये उर्वशी रौतेलाकडून झाली मोठी चूक,  सोशल मीडियावर हात जोडून मागितली माफी

[ad_1]

हायलाइट्स:

  • विदेशातही आहे उर्वशीचे अनेक चाहते
  • उर्वशीची तब्येत ठीक नसल्याने तिच्याकडून झाली चूक
  • उर्वशीला भेटण्यासाठी ७२ तास हॉटेल बाहेर उभे होते चाहते

मुंबई– बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले. उर्वशी तिच्या अनोख्या स्टाइलसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. उर्वशीच्या फॉलोवर्सची संख्या लाखोंमध्ये आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशातही उर्वशीचे चाहते आहेत. नुकतीच उर्वशी युरोपमध्ये चित्रीकरणासाठी गेली होती. परंतु, तिथे उर्वशीकडून एक चूक झाली आणि अभिनेत्रीने सोशल मीडियावर त्या चुकीची माफीही मागितली. उर्वशीने एका चाहत्यांचा व्हिडीओ शेअर करत त्याची माफी मागितली आहे.

यवतमाळच्या चिमुकल्या गार्गी आणि गायत्रीला CID फेम दयाने पाठवला खास व्हिडिओ

उर्वशीने इंस्टाग्रामवर एका चाहत्याचा व्हिडीओ शेअर करत त्याची माफी मागितली. त्याचं झालं असं की, उर्वशी युरोपमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलमध्ये उर्वशीचे ५० ते ६० चाहते तिला भेटण्यासाठी आले होते. हे चाहते उर्वशीला भेटण्यासाठी मागील ७२ तास न झोपता तिथे उभे होते. परंतु, जेव्हा उर्वशी हॉटेलबाहेर आली तेव्हा तिने तिथे उपस्थित काही चाहत्यांसोबत फोटो काढले आणि घाईत असल्याने निघून गेली. उर्वशीचं हे वागणं मुळीच न आवडलेल्या एका चाहत्याने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो व्हिडीओ पाहून उर्वशीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि हात जोडून माफी मागितली.

चाहत्याचा व्हिडीओ शेअर करत उर्वशीने लिहिलं, ‘मी खरच तुमची माफी मागते. माझे जेवढेही चाहते युरोपमध्ये आहेत त्यांची सगळ्यांची मी माफी मागते. तुम्ही माझ्यासाठी ७२ तास हॉटेल बाहेर उभे राहिलात आणि माझी तब्येत खराब असल्याने मी तुम्हाला वेळ देऊ शकले नाही. मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करते. मी तुमचा सन्मान करते. कृपया त्या व्हिडिओमधील मुलाला टॅग करा. मी त्याला वैयक्तिकरित्या येऊन भेटेन. मला खरच माफ करा.’ या घटनेवरून उर्वशीच्या विदेशातील फॅन फॉलोविंगचा देखील अंदाज येतो.

‘ते दोघे एकत्र’, विकी- कतरिनाच्या नात्यावर हर्षवर्धनचा खुलासा

[ad_2]

Source link