राज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अंत्ययात्रेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये मंदिराची अवस्था पाहायला मिळत आहे. तिचं रडणं थांबत नाहीए. तिला या धक्क्यातून सावरता यावं साठी मंदिराचे जवळचे काही मित्र तिला धीर देतायत.
राज यांच्या निधनानंतर आयुष्य हे क्षणभंगूर असल्याची जाणीव झाली अशी प्रतिक्रिया अभिनेता दिनो मोरिओने दिली आहे. ‘गेल्या आठवड्यात राज यांना भेटायचे होते. परंतु माझी तब्येत ठीक नसल्यानं आमची भेट झाली नाही. राज हा अतिशय उमदा माणूस होता. दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेल्या त्याच्यासारख्या व्यक्तीचे हार्ट अॅटकने निधन व्हावे, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आयुष्य क्षणभंगूर असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपण जगायला हवा अशी पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली आहे. मला भावना व्यक्त करायला शब्द सुचत नाहीयेत…’, असंही दिनो म्हणाला.