Home शहरे पुणे होम क्वॉरंनटाईनच्या आदेशाचे उल्लंघन करून फिरणारे 8 विदेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात

होम क्वॉरंनटाईनच्या आदेशाचे उल्लंघन करून फिरणारे 8 विदेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात

पुणे – पुण्यात होम क्वॉरंनटाइनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 8 विदेशी नागरिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या 8 विदेशी नागरिकांमध्ये 4 महिला आणि 4 पुरूषांचा समावेश आहे. हे आठही जण टाझांनिया येथील रहिवाशी असून पुण्याच्या नाना पेठेत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने त्या भागात धाव घेऊन या नागरिकांना ताब्यात घेऊन उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच त्यांच्याविरोधात समर्थनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.