हायलाइट्स:
- करणने केला होता निशाने कॅमेरे बंद केल्याचा आरोप
- निशाने आरोप मान्य करत सांगितलं कारण
- कॅमेरासमोर करणची वागणूक होती वेगळी
दिलासा! राज्यातील चित्रीकरणाला सोमवारपासून सशर्त परवानगी
करणने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘आमच्या चार बेडरूमच्या घरात सात कॅमेरे बसवलेले आहेत. बेडरूम सोडून प्रत्येक खोलीत कॅमेरा आहे. हॉलमधील कॅमेरा देखील अशा प्रकारे लावण्यात आलेला आहे ज्यात ती भिंत दिसू शकते ज्या भिंतीवर निशाने आपलं डोकं आपटून घेतलं होतं. पण त्यानंतर मला कळालं की, निशाने घरातील सगळे कॅमेरे बंद केले आहेत. जर माझ्याकडे आता ती क्लिप असती तर सगळं काही आताच स्पष्ट झालं असतं. पण कॅमेरांचा मुख्य स्विच बंद केलेला होता. हे सगळं काही आधीपासूनच ठरवून केलं गेलं आहे असं मला वाटतं.’
करणच्या या आरोपांवर निशाने देखील तिची बाजू मांडली आहे. करणने केलेले आरोप मान्य करत निशाने म्हटलं, ‘हो, घरातील कॅमेरे बंद होते कारण मीच काही दिवसांपूर्वी ते बंद केले होते. करणला माहित होतं की घरात कुठे कुठे कॅमेरे आहेत. तो कॅमेरांसमोर आमच्यासोबत खूप चांगला वागायचा. मुलासोबत खेळायचा. पण, बेडरूममध्ये जिथे कॅमेरा नव्हता तिथे तो मला मारायचा. ते कधीही कॅमेरात दिसणार नव्हतं. त्यामुळे मी खूप आधीच कॅमेरे बंद करून ठेवले होते. आता पोलिसांनी रेकॉर्डर ताब्यात घेतला आहे.’
‘द फॅमिली मॅन ३’ची तयारी सुरू, चीनसोबत लढताना दिसणार मनोज बाजपेयी?