Home गुन्हा हौसेखातीर पिस्तुल बाळगणारा आरोपी जेरबंद

हौसेखातीर पिस्तुल बाळगणारा आरोपी जेरबंद

0

पुणे-परवेज शेख

दिनांक 2 /9/2019 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णू पवार यांच्या आदेशाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड व तपास पथकातील कर्मचारी गणपती प्राणप्रतिष्ठा बंदोबस्त असल्याने पेट्रोलिंग करीत होते पेट्रोलिंग करत असताना पोलिस कर्मचारी कुंदन शिंदे व कृष्ण बढे यांना त्यांच्या खास बातमीदार यामार्फत बातमी मिळाली कात्रज गुजरवाडी फाटा येथे एक इसम उभा असून त्याच्या कमरेला पिस्तूल लावलेला आहे मिळालेल्या बातमीवरून गुजरवाडी फाटा येथे जावून सोबतच्या स्टाफचा मदतीने सापळा रचून मनोहर रघुनाथ मांगडे वैभव चाळीस वर्ष राहणार सूष्टी हॉटेलच्या शेजारी मांगडेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे यास ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला डाव्या बाजूस खोचलेले गावठी देशी बनावटीचे लोखंडी धातूचे पिस्तूल त्याची किंमत अंदाजे 25 हजार रुपये आणि एक जिवंत काडतूस त्याची किंमत 100 रुपये असे मिळून आले त्यास पिस्तोल जवळ बाळगण्याचा परवाना आहे का किंवा ते कोणाकडून आणले आहे याबाबत विचारले असता त्याने त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगून ते मारुती घोरपडे राहणार जांभुळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या कडून हौसेखातर घेतले असल्याचे सांगितले त्यानंतर जांभुळवाडी व दत्तनगर भागात मारुती घोरपडे व 43 वर्ष राहणार मुक्काम पोस्ट लासुर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडे पिस्टल बाबत अधिक सखोल तपास केला असता त्याने सन 2015 साली यादव नावाच्या बिहारी इसमाकडून घेतल्याचे सांगितले आहे आरोपी मनोहर मांगडे याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न तर मारुती घोरपडे याच्यावर कोथरुड पोलीस ठाणे येथे बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याचा बारामती पोलीस ठाणे येथे जमिनी संदर्भातील फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री श्रींकात तरवडे, परिमंडळ पुणे चे पोलीस उपायुक्त श्री शिरीष सरदेशपांडे सो, सहा. पोलीस आयुक्त श्री मालोजीराव पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे. तसेच तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुबराव लाड पोलीस कर्मचारी कृष्णा बढे. कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, सचिन पवार. राहल तांबे, गणेश चिचंकर, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलीक, अभिजीत जाधव, योगेश सुळ यांनी केलेली आहे