Home ताज्या बातम्या १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीकचा “सरताज” आज जगभर साजरा होत आहे व्हॅलेंटाईन डे

१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीकचा “सरताज” आज जगभर साजरा होत आहे व्हॅलेंटाईन डे

0

१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीकचा “सरताज” आज जगभर साजरा होत आहे……..  *व्हॅलेंटाईन डे*💖 💞
 
प्रेम’ म्हणजे निव्वळ ‘टाईमपास’* अशी धारणा बाळगणारा “रोमचा राजा द्वितीय केलेडियस” ने रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. रोमचा प्रसिध्द संत व्हॅलेंटाइन याला प्रेमावरील अशी बंदी मान्य नव्हती. वास्तविक जग प्रेमावर तरले आहे. व्हॅलेंटाइनने राजाचा हुकूम धुडकावत सैनिकांचा विवाह लावून दिला. हे राजाला समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं. 🔗⛓️

कारागृहात असताना त्याचे जेलरच्या मुलीवर प्रेम जडले. ही बाब जेलरने राजाला कळविली. मग रोमन राजा केलेडियसने व्हॅलेंटाइनला या प्रेमाची शिक्षा म्हणून १४ फेब्रुवारी या दिवशी फासावर लटकविले. ➰ तेव्हापासून जगभरातील प्रेमाला प्रोत्साहन देणारा संत व्हेलेंटाईन यांचे स्मरणार्थ १४ फेब्रुवारी साजरा केला जात आहे.

दोन संस्कृती एकत्र येतात तेव्हा एकमेकांच्या संस्कृतीचे परस्परांवर प्रभाव पडणे हे अपेक्षितच असते. ब्रिटिशांनी भारतांवरच नव्हे तर जगावर राज्य केले. त्यांच्या संस्कृतीने आणि विचारसरणीने जगभर शिरकाव केला. तत्पुर्वी मुस्लीम राजवटीतील अनेक चालीरिती भारतीय परंपरेवर हावी होत भारतीय परंपरेत रुजल्या. सध्या अनेक भारतीय परदेशात स्थायिक आहेत. ते तिकडे शिवजयंती, डॉ.आंबेडकर जयंती, गणेशोत्सव,दिवाळी, होळी असे भारतीय सण साजरे करत असतात. कुतूहल म्हणून तेथील जनता अशा इवेंटकडे पाहत हळुहळु ती साजरी करू लागतात. सोशल मिडीयाद्वारे आपण ही ती मोठ्या अभिमानाने शेअर देखील करतो. यालाच एका संस्कृतीचे दुसऱ्या संस्कृतीत रूजणे म्हणतात. 🇬🇧💝🇮🇳

परकिय देशात “प्रेम” आणि “विवाह” ही जास्त काळ टिकत नाहीत ही भारतीयांची धारणा! संत व्हेलेंटाईन याने “विवाह” व “प्रेम” याला बळकटी दिली. म्हणूनच त्याच्या स्मरणार्थ परदेशात साजरा होणारा “व्हेलेंटाईन डे” हा सुरूवातीला एकमेकांवरील अतोनात प्रेमाखातर पती-पत्नी साजरा करीत. परंतू कालांतराने प्रेमीयुगलांनी तो आपलासा केला आणि मग त्याला जागितक स्वरूप प्राप्त झाले. 🌍

भारताने उदारमतवादी धोरण अवलंबिल्यापासून पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांच्यात एकमेकांच्या प्रथा, चालीरिती आणि परंपरांची देवाणघेवाण सुरू झाली. जसा संस्कृतींचा एकमेकांवर प्रभाव पडतो तसा ती साजरी करण्यात पुढाकार घेतला जातो. त्यातीलच एक म्हणजे आजचा व्हॅलेंटाईन डे..! 🌹💞

प्रेमभाव असल्याविना प्रीती हा गुण विकसित होत नसतो. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या Valentine’s Week मधील रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे लागोपाठ साजरे केलेले पाश्चात्य परंपरेतील सात (७) दिवस म्हणजे भारतीय परंपरेतील सप्तपदी जणू ! या सात दिवसात परदेशी पती-पत्नी जोडप्याला जे अभिप्रेत असते तेच तर आपल्या “सप्तपदी” मध्ये अधोरेखित केले गेले आहे.🦶🦶🦶🦶🦶🦶🦶

आपल्याकडील राधा-कृष्णाचे प्रेम आणि त्यांच्या Romoe-Juliet चे LOVE जगाला हाच संदेश देतात की जग प्रेमावरच तरले आहे. 🌍💓

📚✒️ लिखाणाचा हा सारा खटाटोप याच करीता

म्हणूनच व्हॅलेंटाईन वीकचा हा आठवा प्रेमाचा “सरताज”  दिवस “व्हॅलेंटाईन डे” साजरा करणाऱ्या आणि जगभर प्रेम जागृत ठेवणाऱ्या साऱ्यांना यानिमित्त प्रेमाच्या शुभेच्छा…! 🌹💖

🌹 लेखक-©®संजीव केशव देवकर
https://www.facebook.com/sanjivdeokarpune/