१४ फेरे

१४ फेरे
- Advertisement -



सुशिक्षित, नोकरी-व्यवसाय करणारे आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात बुडालेले आहेत. त्यांना हवं तर ते पळून जाऊन लग्न करू शकतात; परंतु त्यांना कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करायचं नाही. कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांच्या साक्षीनंच त्यांना विवाह करायचा आहे. अडचण आहे, ती त्यांच्या जातीची. दोघंही वेगळ्या जातीतले असल्यानं पालकांचा विरोध आहे. दुर्दैवानं देशभरात अशा घटना आपल्याला घडताना दिसतात. आंतरजातीय विवाह प्रकरणं केवळ कुटुंब आणि समाजाच्या विरोधापर्यंत मर्यादित राहत नाहीत. आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या हत्यांच्या घटना आजही सुरू आहेत. याच कुप्रथांच्या विरोधात विनोदीशैलीत भाष्य करणारा ‘१४ फेरे’ हा चित्रपट आहे.

यापूर्वी ‘उडान’ आणि ‘चिंटू का बर्थ डे’ असे संवेदनशील चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या देवांशु सिंह याचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट हसवताना बुरसटलेल्या विचारांच्या समाजाला चपराकही लगावतो. आंतरजातीय विवाह या विषयाभोवतीचे विविध पैलू लेखक-दिग्दर्शकानं चित्रपटात दाखवले आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक अनोखा सुवर्णमध्यही त्यांनी गमतीशीर पद्धतीनं मांडला आहे. दिग्दर्शकानं जातीयवाद, ऑनर किलिंग आणि हुंडा या समस्या आणि त्यातून बाहेर पडण्याचं उत्तर विनोदाच्या रूपात एकाच कथेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. गोष्ट संवेदनशील आणि महत्त्वाची असली, तरी ती मांडताना त्याच्या व्याकरणाचा विचार होणं आवश्यक असतं. या चित्रपटाबाबत तसं झालेलं नाही. पटकथा विस्कळीत वाटते. त्यामुळे रंजक पद्धतीनं गोष्ट सांगण्यात दिग्दर्शक पूर्णपणे यशस्वी होत नाही.

दिल्लीतल्या कॉलेजमध्ये एकत्र शिकणारे संजय लाल सिंह (विक्रांत मेस्सी) आणि अदिती कडवासरा () हे दोघं प्रेमात पडतात. कॉलेज शिक्षणांनंतर दोघांनाही चांगल्या नोकऱ्या मिळतात. नोकरीनिमित्त ते घरापासून दूर असतात; पण त्यांच्या डोक्यावर कुटुंबियांच्या धाकाची टांगती तलवार असते. दोघांच्या घरून स्वतःच्या जातीतच लग्न व्हावं असा हट्ट असतो. संजय बिहारचा राजपूत आहे आणि आदिती जयपूरमधल्या जाट कुटुंबातली आहे. या दोघांनाही पळून जाऊन लग्न करायचं नसतं. या किचकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ते दोघं दोन लग्नाची योजना आखतात, ज्यात ते दोन वेळा अर्थात ‘१४ फेरे’ घेतात. ही १४ फेऱ्यांची योजना नेमकी काय आहे? ती कशी आखली जाते? त्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं? ही योजना यशस्वी होते का? या सगळ्याची उत्तरं चित्रपटात मिळतील. विक्रांत आणि कृती या दोघांचाही अभिनय उत्तम. ची छोटी भूमिकाही दमदार आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उजवा आहे. खिळवून ठेवण्यात कमी पडत असला, तरी कथा आणि त्यामागचं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. हेच चित्रपटाचं यश म्हणता येईल.

१४ फेरे

निर्मिती ः झी स्टुडिओ

दिग्दर्शक ः देवांशु सिंह

लेखक ः मनोक कलवानी

कलाकार ः , कृती खरबंदा, गौहर खान

छायांकन ः राजू दास

संकलन ः मनन सागर

ओटीटी ः झी ५

दर्जा ः अडीच स्टार



Source link

- Advertisement -