Home अश्रेणीबद्ध १९ ,२० ऑक्टोबर रोजी पुण्यात भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

१९ ,२० ऑक्टोबर रोजी पुण्यात भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

 

१९ ,२० ऑक्टोबर रोजी पुण्यात भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन  

पुणे : परवेज शेख

इंटरनॅशनल गीता फाऊंडेशन ट्रस्ट , अवधूत दत्त पीठम्( म्हैसूर ) आणि भारतीय विद्या भवन ( पुणे ) या संस्थांच्या वतीने पुण्यात १७ व्या दोन दिवसीय  ‘ ग्लोबल गीता कॉन्फरन्स ‘  या भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.दिनांक १९ आणि २० ऑक्टोबर रोजी ही परिषद भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता ,पुणे) येथे होईल . प्रामुख्याने 17 व्या अध्यायातील श्लोकांचे विवेचन या परिषदेत होणार आहे. याधीच्या परिषदा अमेरिका, इंग्लंड, भारतात झाल्या होत्या. देशातून, देशाबाहेरील एकूण 12 वक्ते परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

संयोजकांचे प्रतिनिधी  डॉ.पी.व्ही. नाथ, सी.एन. गुप्ता,नंदकुमार काकिर्डे   यांनी पत्रकार  परिषदेत  ही माहिती दिली . 

 पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे दिनांक  १५ ऑक्टोबर, दुपारी २ वाजता ही पत्रकार परिषद झाली. देशातून आणि परदेशातून भगवद्गीतेचे अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत . भगवदगीतेतील श्लोक ,संदेश यावरील व्याख्याने ,गीतेतील अध्यायांचे सामुहिक पठण अभंग -भजन गायन असे अनेक कार्यक्रम या आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार आहेत . 

१९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता परिषदेचे उद्घाटन न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या हस्ते होईल. ११ वाजता होणाऱ्या पहिल्या सत्रात न्या बी एन श्रीकृष्ण गीतेतील श्लोक क्रमांक १,2,३, (श्रद्धा ) या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर डॉ पी व्ही नाथ ,श्री स्वामी जनपद महाराज,डॉ लीना परदेशी (अमेरिका) ,टेरी रान(अमेरिका) बोलणार आहेत. 

२० ऑक्टोबर रोजी डॉ शैलजा कात्रे ,ब्रह्मचारिणी मैत्रयी चैतन्य ,श्री राघवन (बेंगळूरू ),श्री विजयानंद तीर्थ स्वामी ,श्री श्रीकान्थ (अमेरिका ) इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत .