Home गुन्हा १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत राऊंड विक्रीस आलेला ,व २ दरोड्यातील फरार अशा, ३ आरोपींना अटक केली आहे

१ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत राऊंड विक्रीस आलेला ,व २ दरोड्यातील फरार अशा, ३ आरोपींना अटक केली आहे

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी ) रमेश कांबळे

१ देशी बनावटीचे पिस्टल , २ जीवंत काडतुसे विक्री करण्याकरीता बाळगणारया एक इसमाकडून ८३ हजाराचा मुददेमाल जप्त तसेच दुस-या कारवाईमध्ये वेगवेगळया दोन दरोडया च्या गुन्हयात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पकडले. गुन्हे शाखा ,युनिट- च्या पोलिसांची कारवाई .
रविवार ( ता.२१ ) रोजी सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे व गुन्हे शाखा, युनिट-५ कडील पोलीस, एक इसम पांढरे रंगाची ऍ़क्टीव्हा गाडी क्र एम एच १४ एफ एच ७२४६ या दुचाकी वरून मुकाई चौक येथुन सेंट्रल चौक देहुरोड येथे त्याचेकडे असलेले देशी बनावटीचे पिस्टल विक्रीकरीता येणार असुन त्याने अंगामध्ये निळे रंगाचा जर्कीण व निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली माहितीच्या आधारे सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे यांनी सोबतचे कर्मचारी यांना सुचना देवून त्यांच्या दोन टिम तयार करुन सापळा लावला.
पुणेरी मिसळ हाऊसच्या समोर सेंट्रल चौक येथे येवुन त्याची गाडी कडेला लावून कोणाचीतरी वाट पाहत थांबला. त्याला पोलीसांचा सुगावा लागताच तो गाडी चालू करून पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पोलीस स्टाफचे मदतीने शिताफीने ताब्यात घेतले .शुभम गोविंद झगडे, वय – १९ वर्षे ,धंदा मजुरी( रा मु.पो. शेरी कोरेगाव भिमा जवळ, पाबळ ता शिरूर जि पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

दुस-या एका कारवाई मध्ये गुन्हयातील फरारी आरोपी पकडण्यासा गुन्हे शाखेस विशेष यश आले .सदर आरोपी मोहीम आरोपीं विरुष देहुरोड पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम३९५ प्रमाणे गुन्हा दाखल होता या प्रकरणी , ऋतीक श्रीपती सुर्यवंशी वय -22 (रा राजनगर निगडी ) याला अटक केली आहे. सदरचा आरोपी हा गेल्या दोन वर्षापासून अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देत होता.

देहुरोड पोलीस स्टेशन गु र नं १०६७/१९ ,भादवि कलम३९५ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपीच्या मुसक्या युनिट -५ च्या पोलिसांनी आवळल्या . दिनेश उमापती हेगडे ,वय- २० (रा शितळानगर देहुरोड ,पुणे )हा असे अटक आरोपीचे नाव आहे. त्यास कुणाल हॉटेल जवळ शितळानगर ,देहुरोड येथून शिताफीने पकडले .
)दोन्ही आरोपीस पुढील कारवाईकरीता देहुरोड पोलीस स्टेशन यांच्या कडे देण्यात आले आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा, युनिट-५ चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे व पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर, मयुर वाडकर, दत्तात्रय बनसुडे, दयानंद खेडकर, फारुक मुल्ला, संदिप ठाकरे, धनराज किरनाळे, गणेश मालुसरे, सावन राठोड, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र शेटे व नागेश माळी यांनी केली आहे.