Home ताज्या बातम्या १ लाखांचा ४ किलो गांजा जप्त

१ लाखांचा ४ किलो गांजा जप्त

0

परवेज शेख बावधन परिसरात गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरूणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बावधन येथे सापळा रचून पकडले आहे व. त्याच्याकडून १ लाखांचा ४ किलो गांजा,व १ दुचाकी असा दीड लाखांचा ऐवज जप्त केले.आहे दिनेश सोपान काळे (वय-२८, रा. स्वामी समर्थ नगर, कोंढवा), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार राजन गोविंद महाडीक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश बावधन येथे गांजा विक्रीसाठी आला होता. याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.व पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९८ हजार ७५ रूपयांचा ३ किलो ९७३ ग्रॅम गांजा ५५ हजारांची १ दुचाकी, रोकड असा १ लाख ५३ हजार २९५ रूपयांचा ऐवज जप्त केला.आहे व पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहे