२१ व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुद्ध पाण्‍यावर सर्वांचा अधिकार – मंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

२१ व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुद्ध पाण्‍यावर सर्वांचा अधिकार – मंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
- Advertisement -

आरवट येथील विकास कामांसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा ‍निधी

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील देश घडविण्यासाठी सामान्‍य माणसांच्‍या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणजे 21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार असला पाहिजे, असे प्रतिपादन  वने व सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गणेश उत्‍सवाच्‍या पवित्र दिवशी आरवट येथे आरो मशीनचे उद्घाटन होत असल्‍याचा आनंद असून नागरिकांना सुखसमाधानयशभरभराटी लाभो, अशा शुभेच्‍छा सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

चंद्रपुर तालुक्यातील आरवट या गावी वित्त आयोगाच्‍या निधीतून मंजूर शुध्‍द पाणी देणा-या आरो मशीनचे उद्घाटन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी  25 लक्ष रूपयांच्‍या निधीतून विविध विकासकामांची घोषणा केली. मंचावर  देवराव भोंगळेसरपंच सुलभा भोंगळेउपसरपंच अलका कवठेनामदेव डाहूलेब्रिजभूषण पाझारेराहूल पावडेप्रज्‍वलंत कडूसुरज पेदुलवारविकास जुमनाकेमाजी सरपंच वंदना पिंपळशेंडेरणजित डवरेसंवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळसचिव रंजना मुळेबबन क्षीरसागर आदी उपस्थित होते.

शिक्षणाच्‍या माध्‍यमातून महापुरूषांच्‍या विचारांचा आपण अंगीकार केला पाहिजे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दुध म्‍हटले आहे. महात्‍मा फुलेंनी ‘विद्ये विना मती गेली’ असे तर महात्‍मा गांधी यांनी पुस्‍तक जगातला सर्वात चांगला मित्र आहे, असे म्‍हटले आहे. आरवट या गावात शिक्षणाची उत्तम सुविधा निर्माण होण्‍याकरीता जिल्‍हा परिषद शाळेच्‍या माध्‍यमातून कार्य करण्‍यात येईल. गावातील विकासकामांमध्‍ये लहान मुलांसाठी खेळणीबंदिस्‍त नाली तसेच इतर कामांना पहिल्‍या टप्‍प्‍यात माझ्या स्‍थानिक विकास निधीतून 25 लक्ष रूपये मंजूर करून  कामे तात्‍काळ सुरू करण्‍यात येतील. तसेच शेतीशिक्षणजलसंधारणआरोग्‍यरोजगार या क्षेत्रामध्‍ये सुध्दा कामे करण्‍यात येईल. आरवट येथील भजन मंडळाला नवीन साहित्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. राज्यामध्ये नवीन सरकार येताच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असल्याचे श्री. मुनगंटीवार म्‍हणाले.

यावेळी श्री. मुनगंटीवार यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल गावक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील डॉक्टरांच्या यशाने जिल्ह्याची शान उंचावली – मंत्री सुधीर मुनगंटीवार

यशवंत डॉक्टरांचा सत्कार

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : चंद्रपूर हा  कोळसा खाणींचा जिल्‍हा आहे. या खाणीतूनच आपण जगाला हिरे देत असतो. याची प्रचिती नुकतीच आली. शा‍रिरीक आणि मानसिक चपळतेची कठीण परीक्षा समजल्या जाणा-या ‘आयर्नमॅन 2022’ स्‍पर्धेत चंद्रपूरच्‍या डॉक्‍टरांनी जर्मनीतील ड्युसबर्ग येथे विजयी पताका फडकविली. डॉक्टरांचे हे यश चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करणारे आहेअसे प्रतिपादन वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आय.एम.ए. सभागृहामध्‍ये आयोजित यशवंत डॉक्टरांच्या सत्‍कार समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी आय.एम.ए. चे अध्‍यक्ष डॉ. अमोल पोद्दारदेवराव भोंगळेसचिव डॉ. नगीना नायडुप्रोजेक्‍टर डायरेक्‍टर डॉ. रवि अल्‍लुरवारकोषाध्‍यक्ष डॉ. अमित देवईकरआय.एम.ए. महिला विंगच्या अध्‍यक्षा डॉ. कल्‍याणी दीक्षित यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्री. मुनगंटीवार म्हणालेअर्जुनाला जसे केवळ पोपटाचा डोळा दिसत होता तसेच आपण आयुष्‍यामध्‍ये एकाग्रता ठेवून यश संपादन केले पाहिजे. जिद्दनिष्ठापरिश्रम आणि चिकाटी यातून साकारलेले यश चिरंतन काळ टिकणारे असते. असेही ते म्हणाले.

जर्मनीतील ड्युसबर्ग येथे आयर्नमॅन 70.03 स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली होती. यात 1.91 किलोमीटर पोहणे91 किलोमीटर सायकलींग आणि 21 किलोमीटर धावणे असे प्रकार होते. हे तिन्‍ही प्रकार 8.30 तासांच्‍या कालावधीत पूर्ण करीत चंद्रपूरच्‍या इंडियन मेडीकल असोसिएशनशी संलग्‍नीत डॉक्‍टरांनी पुस्‍कारावर आपले नाव कोरले आहे. यामध्‍ये डॉ. संदीप मुनगंटीवारडॉ. कल्‍पना गुलवाडेडॉ. सचिन भेदेडॉ. प्राजक्‍ता आस्‍वारडॉ. गुरूराज कुलकर्णीडॉ. नबा शिवजीडॉ. रिजवान अली शिवजीडॉ. अभय राठोड व पोलिस कर्मचारी श्रीपाद बल्‍की यांचा समावेश असून सर्व यशवंत डॉक्टरांचा यावेळी श्री. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

००००००

- Advertisement -