
मुंबई: दि.२४: पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ ते २७ एप्रिल, २०२५ या कालावधीत शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला भारतरत्न पं भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे.
या महोत्सवाची नवीन तारीख यथावकाश कळवण्यात येईल, असे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0000
- Advertisement -