मुंबई : प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी शब्दांनी नाही तर फक्त भावनांनी प्रकट होते. त्याचप्रमाणे प्रेमाला कोणत्याही प्रकारची बंधन नसतात. बॉलिवूडचा किंग खान अभिनेता अर्थात शाहरूख खानची प्रेम कथा संपूर्ण जगाला माहित आहे. गौरी आणि त्याच्यामध्ये असलेल्या प्रेमळ नितळ नात्याला आज २८ वर्ष पूर्ण झाले आहेत. गोड मैत्रीने सुरूवात झालेली ही मैत्रीची जागा कालांतराने प्रेमाने घेतली.
त्यानंतर अनेक अडचणींवर मात करून त्यांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले आणि त्यांच्या या प्रेमाच्या प्रवासाला तब्बल २८ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच सोनेरी दिवसाचे औचित्य साधत शाहरूखने पत्नी गौरी खान प्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या भावना प्रकट केल्या आहेत.

‘नेहमी असं वाटतं की कालचीच गोष्ट आहे. तीन दशक आणि तीन मुलं. हे सर्व फार सुंदर आहे. एखाद्या परीच्या कथेप्रमाणेच हे आहे.’ अशाप्रकारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे