Home मनोरंजन ३० हजार सिनेकामगारांना दिलासा; यश राज फिल्म्स देणार मोफत लस

३० हजार सिनेकामगारांना दिलासा; यश राज फिल्म्स देणार मोफत लस

0
३० हजार सिनेकामगारांना  दिलासा; यश राज फिल्म्स देणार मोफत लस

[ad_1]

हायलाइट्स:

  • यश चोप्रा फाऊंडेशन करणार ३० हजार कामगारांचं लसीकरण
  • लसीच्या ६० हजार डोसांसाठी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र
  • कामगार लवकरात लवकर कामावर परत यावे यासाठी यश चोप्रा करत आहेत धडपड

मुंबई– देशात करोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते आहे. आरोग्य यंत्रणा दिवस रात्र झटत आहेत. सरकार सगळ्यांना वारंवार मास्क लावण्याची आणि काळजी घेण्याची विनंती करत आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे बॉलिवूडवरही करोनाचा प्रभाव पडला आहे. मोठ्या कलाकारांना या गोष्टीचा फारसा फरक जाणवत नाही परंतु, चित्रपटांचं चित्रीकरण बंद असल्याने छोट्या कामगारांना व तंत्रज्ञाना मात्र दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. अशाच हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी यश राज फिल्म्स बॅनरने मोफत करोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट सस्पेण्ड, आक्षेपार्ह ट्वीटवर अॅक्शन

यश राज फिल्म्सचे प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी याबाबतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे आपल्या ३० हजार कामगारांसाठी ६० हजार करोना लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. या सर्व लसीचा खर्च यश चोप्रा फिल्म्स द्वारे केला जाणार आहे. सोबतच पत्रात नमूद करण्यात आलं आहे की, हे लसीकरण करण्याची संपूर्ण जबाबदारी यश चोप्रा फाऊंडेशन करणार आहे. कामगारांमध्ये जागरूकता आणण्याचं काम देखील या फाऊंडेशन तर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या निवेदनाचा विचार व्हावा. त्यानंतर कामगार पुन्हा कामावर परत येऊ शकतील.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज द्वारेही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे ज्यात लिहिलं आहे की, बॉलिवूड सध्या भयंकर परिस्थितीतून जात आहे. यश राज फिल्म्स यांच्याकडून आलेल्या पत्राला मान्यता देऊन लवकरात लवकर आम्हाला मदत केली जावी. कारण हे डोस त्या कामगारांना दिले जाणार आहेत ज्यांना याची सगळ्यात जास्त गरज आहे. हे हातावर पोट भरणारे कामगार आहेत. त्यांच्या कुटुंबाचं पालनपोषण त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना काही झालं तर एका संपूर्ण कुटुंबाची वाताहत होईल. यश राज फिल्म्स यांनी दिलेल्या निवेदनाचा कृपया विचार व्हावा.

ट्रोल होण्याच्या भीतीने जान्हवीने इन्स्टा फोटोवर दिलं स्पष्टीकरण

[ad_2]

Source link