मलकापुरात स्थानिक गुन्हे शाखा यांची धडक कारवाई 39 हजाराच्या नकली नोटा पकडल्या
मलकापूर : शहरातील वानखेडे पेट्रोल पंप नजिक नकली नोटांची देवाण-घेवाण होणार असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पो,उप. नि. इमरान इमानदार यांना मिळाल्यावरून एलसीबी चे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख,पो.उप.नि इमरान इमानदार ,पो.काँ.प्रकाश राठोड ,पो कॉ. संदीप मोरे पो कॉ नदीम शेख, चालक भरत राजपूत यांनी सायंकाळी सात वा दरम्यान सापळा रचला या सापळ्यात शेख कलीम शेख जैनुद्दीन उर्फ कलीम अण्णा ( वय 40 ) आमीर सोहेल उर्फ राजू शेख रिसाल उद्दीन ( वय 25 ) दोघे रा. बोदवड यांना पकडले या दोघांचे जवळून 200 च्या 173 नोटा ,शंभर रुपयाच्या 50 नोटा असे एकूण 39 हजार सहाशे रुपये तर एक दुचाकी मोटरसायकल व दोन मोबाईल दोघांची किंमत एकूण 50 हजार रुपये असा एकूण 90 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल या दोघांकडून ताब्यात घेतला आहे या दोघांवर मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.