३ तास अथक परिश्रम करून नदीतून काढले बाहेर मृतदेह

- Advertisement -

पोलादपूर हद्दीत एक व्यक्ती पाण्यात पडला अशी खबर मिळताच कारवाई करता स्थानिक ट्रेकिंग टीम यांनी मोठा धोका पत्करून शासकीय यंत्रणेला मदत केली. सदर व्यक्ती ही मयत स्थितीत मिळून आली असून त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झालेला असावा तरी सदर बाबत अकस्मात मृत्यू दाखल करून व पुढील कारवाई करण्यात येत आहे.

दिनांक 27.7.2019 रोजी रात्री नऊच्या सुमारास माहिती मिळाली की एक व्यक्ती नाव राजेंद्र विश्राम शेलार वय 26 वर्षे हा पोलादपूर पासून सुमारे 25 किलोमीटर लांब असणाऱ्या कुडपन बुद्रुक या गावाकडे जाणाऱ्या, जगबुडी नदीच्या छोट्या पूलाचे खाली दगडाचे सांध्या मध्ये पाण्यात अडकून पडलेला आहे. अशी खबर मिळताच पोलिस स्टाफ सह सिस्का ग्रुप, महाड व कर्तव्य प्रतिष्ठान, पोलादपूर हे नमूद घटनास्थळी तात्काळ रवाना झाले. सदर घटनास्थळी पोलीस स्टाफ बरोबर सहकार्य करीत वरील दोनही ट्रेकर्स ग्रुपने अतिशय मोठा धोका पत्करून खूप मोठ्या जोराने वाहणाऱ्या नदीच्या पाण्यामध्ये ट्रेकिंगच्या साहित्याच्या आधारे सुरक्षितरित्या उतरून नमूद मयत व्यक्ती यास पाण्यातून बाहेर काढले सदर रेस्क्यू मिशन 3 तासात पूर्ण झाले. सदर कारवाई करताना त्यांनी मोठा धोका पत्करून शासकीय यंत्रणेला मदत केली आहे.
नमूद मयत व्यक्ती हा मयत स्थितीत मिळून आला असून त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झालेला असावा तरी सदर बाबत अकस्मात मृत्यू क्रमांक १२ दाखल करून पंचनामा दाखल केला आहे व पुढील कारवाई करण्यात येत आहे

- Advertisement -