५० हजार नागरिक दरडींच्या छायेत; ‘ही’ आहेत मुंबईतील धोकादायक दरडींची ठिकाणे

५० हजार नागरिक दरडींच्या छायेत; ‘ही’ आहेत मुंबईतील धोकादायक दरडींची ठिकाणे
- Advertisement -

मुंबई शहर आणि उपनगरातील २४पैकी २१ विभागांमध्ये दरडी कोसळण्याची २९१ ठिकाणे आहेत. त्यापैकी भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, साकीनाका खाडी नंबर दोन, कुर्ला, मलबार हिल येथे सर्वाधिक ठिकाणे असून भांडुप, विक्रोळी, घाटकोपरला धोकादायक जागा अधिक आहेत. गेल्या काही वर्षांत या भागात दरडींच्या सर्वाधिक दुर्घटनांची नोंद झाली आहे. दरडींच्या परिसरात सुमारे ४० ते ५० हजारांहून लोक राहत असल्याचा अंदाज आहे.

मुंबईत जमिनीला आलेल्या सोन्याच्या भावामुळे सामान्य नागरिकांना सखल भागातील झोपडपट्टीतही घर विकत घेणे शक्य नसल्याने आर्थिक मजबुरीने असे नागरिक उंच डोंगरांवरील घरांच्या आश्रयाला जातात. पाठीमागे डोंगर आणि पावसाळ्यात या डोंगरावरून वाहत येणारे पाणी, चिखलाचे लोंढे यामुळे पावसात अतिशय धोकादायक स्थितीतील दरडींखाली हे नागरिक राहतात. वाढत्या कुटुंबाला जागा पुरत नाही म्हणून डोगरांत लोखंडी सळया टाकून घरे आणखी उंच व अधिक मजल्यांची केली जातात. त्यामुळे पावसाळ्यात दुर्घटनांचा धोका आणखी वाढतो आहे.

सन विभाग मृत्यू

१९९३ जरीमरी कुर्ला १७

२००० घाटकोपर ७८

२००५ साकीनाका ७३

२००९ अँटॉप हिल ११

धोकादायक विभाग दरडींची ठिकाणे

भांडुप एस १५२

घाटकोपर एन ३२

कुर्ला एल १८

ग्रँट रोड डी १६

मालाड पी उत्तर ११

चेंबूर एम पूर्व ११

वरळी जी दक्षिण १०

परळ एफ दक्षिण ७

Source link

- Advertisement -