Home मनोरंजन ५३ सर्जरीवरही वरचढ ठरला योग, कंगना रणौतने सांगितली अ‍ॅसिड अटॅकनंतरची बहिणीची अवस्था

५३ सर्जरीवरही वरचढ ठरला योग, कंगना रणौतने सांगितली अ‍ॅसिड अटॅकनंतरची बहिणीची अवस्था

0
५३ सर्जरीवरही वरचढ ठरला योग, कंगना रणौतने सांगितली अ‍ॅसिड अटॅकनंतरची बहिणीची अवस्था

[ad_1]

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत स्वतःला फिट ठेवण्यासाठी योग करते. आज आंतरराष्ट्रीय योग दिवसांच्या निमित्तानं कंगनानं तिच्या कुटुंबाला योग करण्याचा कसा फायदा झाला हे सांगितलं आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून कंगनानं लोकांना योग करण्यासाठी प्रेरित करत आहे. एक दिवसांपूर्वीच कंगनानं योग केल्यानं कशाप्रकारे तिच्या आईची हृदयावरील शस्त्रक्रिया टळली हे सांगितलं होतं. त्यानंतर आता कंगनानं तिची बहीण रंगोलीला अ‍ॅसिड अटॅकनंतर योग करण्याचा कसा फायदा झाला हे एका पोस्टमधून सांगितलं आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं तिची बहीण रंगोली चंडेल हिचा चेहरा अ‍ॅसिड अटॅकमुळे कशाप्रकारे जळला हे सांगितलं आहे. कंगनानं लिहिलं, ‘रंगोलीचे कान अ‍ॅसिड अटॅकमुळे विरघळून गेले होते. याशिवाय तिच्या छातीवरील काही भाग जळला होता. तिचा जवळपास अर्धा चेहरा या अ‍ॅसिड अटॅकमध्ये जळून गेला होता. एका डोळ्यानं दिसणं बंद झालं होतं. पण एवढं सर्व होऊनही फक्त २-३ वर्षांतच तिच्यावर तब्बल ५३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका रोड रोमियोनं केलेल्या अ‍ॅसिड अटॅकमुळे तिचं फक्त शारिरीकच नाही तर मानसिक नुकसानही झालं होतं.’

इन्स्टाग्राम लिंक- https://www.instagram.com/p/CQVNTBdhKTC/?utm_source=ig_web_copy_link

कंगनानं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिल, ‘अ‍ॅसिड अटॅकनंतर रंगोलीनं सर्वांशीच बोलणं किंवा काही उत्तर देणं बंद केलं होतं. तिला थेरपी दिली जात होती. पण ती कोणाशीच बोलत नव्हती. तिचा साखरपुडा एका एअरफोर्स अधिकाऱ्याशी झाला होता. जेव्हा त्यांनी अ‍ॅसिड अटॅकनंतर रंगोलीचा चेहरा पाहिला तेव्हा ते निघून गेले आणि परत कधीच आले नाहीत. पण एवढं होऊनही रंगोलीनं डोळ्यातून एक अश्रूही काढला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिला मानसिक धक्का बसला आहे. तिची ट्रीटमेंट सुरू झाली. औषधं वेळच्या वेळी दिली जात होती. पण त्याने काहीच फरक पडला नाही.’

इन्स्टाग्राम लिंक- https://www.instagram.com/p/CQWQB7Rh1k0/?utm_source=ig_web_copy_link

कंगनानं पुढे लिहिलं, ‘हे सर्व झालं तेव्हा मी १९ वर्षांची होते आणि मी माझे योग गुरू सूर्य नारायण यांच्यासोबत योग प्रशिक्षण सुरू केलं होतं. मला माहीत नव्हतं की योग केल्यानं एखाद्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल. रंगोलीनं कसंही करून माझ्याशी बोलावं म्हणून मी तिला माझ्यासोबत सर्व ठिकाणी घेऊन जात असे. ज्यात योग क्लासचा समावेश होता.’

कंगनानं तिच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिलं, ‘मी रंगोलीला योग क्लासला घेऊन जात होते आणि त्यावेळी तिनंही योग शिकायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्या वागण्यात कमालीचा फरक पडलाय हळूहळू तिनं बोलायला सुरूवात केली. तिच्या वेदना कमी होत गेल्या आणि ज्या डोळ्यानं दिसणं कमी झालं होतं त्यातही फरक जाणवू लागला होता. कोणत्याही समस्येवर योग हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे योग प्रत्येकानं करायला हवा.’

इन्स्टाग्राम लिंक- https://www.instagram.com/p/CQXhrN5BH4E/?utm_source=ig_web_copy_link

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात ‘थलायवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात तिनं तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय कंगनाकडे ‘धाकड’ आणि ‘तेजस’ असे दोन चित्रपट आहेत.

आज जगभरात साजरा होतोय आतंरराष्ट्री योग दिवस
आतंरराष्ट्री योग दिवसच्या निमित्तानं कंगनानं शेअर केलेत तिच्या कुटुंबीयांचे अनुभव
कंगनानं सांगितलं कशाप्रकारे अ‍ॅसिड अटॅकनंतर बहिणीला झाला योग करण्याचा फायदा



[ad_2]

Source link