हायलाइट्स:
- नताशा पूनावाला आणि प्रियांका चोप्रा विम्बल्डच्या अंतीम सामन्याला उपस्थित
- नताशा सिरम इन्स्टिट्यूच्या डायरेक्टर
- नताशा त्यांच्या लाखमोलाच्या बॅगमुळे झाल्या ट्रोल
नताशा यांची लाखमोलाची बॅग
प्रियांका चोप्राने नताशासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये नताशाच्या हातात जी बॅग दिसत आहे त्या बॅगेची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल ८० लाख रुपये इतकी आहे. या लाखमोलांच्या बॅगमुळे नताशाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. नताशा पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. नताशा तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या बॅगची किंमत ऐकून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.
नताशा यांच्या बॅगेची किंमत ऐकून एका युझरने लिहिले की, ‘हे इतक्या चढ्या दरात व्हॅक्सिन विकत आहेत, त्यामुळे यांच्याकडे पैसाच पैसा आहे.’ तर दुसऱ्या एका युझरने लिहिले, ‘मी इतकी महागडी बॅग विकत घेण्याऐवजी एक मोठे घरच विकत घेतले असते.’

अशा प्रकारच्या टीका करणाऱ्या अनेक कमेन्ट युझर्सने केल्या आहेत. दरम्यान, नताशा पूनावाला यांचे सोशल मीडियावर खूपच फॉलोअर्स आहेत. नताशा या फॅशनबाबत खूपच जागरूक असल्याने त्या संदर्भात त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांच्या पोस्टची त्यांचे फॉलोअर्स वाट बघत असतात.