विजयापूर : होय… अलमट्टीतून विसर्ग करायला जरासा उशीर झाला. अगोदरच जर विसर्ग केला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती… अशी धक्कादायक कबुली राज्य शासनाकडून कर्नाटकात अलमट्टीच्या निरीक्षणासाठी गेलेले अधिकारी श्रीपाद मलघम यांनी दिली आहे.श्रीपाद मलघम हे राज्य शासनाच्या सिंचन विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. गेले काही दिवस ते अलमट्टीत तळ ठोकून आहेत. अलमट्टीतून पाण्याचा किती विसर्ग केला जातोय, याची माहिती ते राज्य शासनाला देत आहेत.मलघम यांनी केलेल्या धक्कादायक खुलाशाने फडणवीस सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात विसंवाद असल्याचं स्पष्ट होत आहे. तर आम्ही पहिल्यापासून सहकार्य करत आहोत, असं अलमट्टी प्रशासनाने म्हटलं आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच कर्नाटक सरकारला सांगून विसर्ग वाढवला असता तर लाखो लोकांच्या डोक्यावरचं उडालेलं छप्पर आणि आयुष्याची झालेली राखरांगोळी… हे सगळं काही वाचलं असतं, अशा भावना आता लोक व्यक्त करत आहेत.
‘हो… अगोदरच विसर्ग केला असता तर होत्याच नव्हतं झालं नसतं अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा
- Advertisement -





















WhatsApp