Home गुन्हा 117 गुन्ह्यातील 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल पुणे पोलिसांकडून हस्तगत अटल दरोडेखोर गुन्हेगार जेरबंद

117 गुन्ह्यातील 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल पुणे पोलिसांकडून हस्तगत अटल दरोडेखोर गुन्हेगार जेरबंद

0

पुणे : परवेज शेख पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गुंगारा देवुन धुमाकूळ घालणाऱ्या अटटल दरोडेखोराकडून सव्वा कोटी चा माल हस्तगत व दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी गुन्ह्यात सराईत गुन्हेगारांच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 117 गुन्हे उघडकीस आणले असून 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक

दरोडेखोराकडून पुणे ग्रामीण व पुणे शहरात धुमाकुळ घातला होता. हडपसर पोलिसांनी नाकोडा ज्वेलर्स दुकानावर पडलेल्या दरोड्याचा छडा लावला आहे.पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग गब्बरसिंग टाक (वय- 19 रा.कैलास स्मशानभुमी समोर, हडपसर), निशांत अनिल ननवरे (वय-22 रा. ताडीवाला रोड), ऋषिकेश तानाजी आतकर ( वय-20 रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पैतरसिंग टाक हा पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरामध्ये दुचाकीवरून सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायट्यांची रेकी करत होता. त्यानंतर ते चारचाकी गाडीतून घरफोडीचे गुन्हे करत होते.

अटक करण्यात आलेले आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून आरोपी नाकोडा ज्वेलर्समध्ये दरोडा टाकून पळून जात असताना त्यांना मोरे वस्तीजवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचून अटक केली. आरोपींनी नाकोडा ज्वेलर्समधून 30 तोळे सोने आणि 40 किलो चांदी लूटून टाटा टॅगो कार (एमएच 12 क्युटी 9725) मधून पळून जाताना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलीस कर्मचारी प्रताप गायकवाड हे जखमी झाले होते. आरोपींकडून विविध कंपन्यांच्या 13 चारचाकी, 5 दुचाकी, 38 किलो चांदी, 1100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग सुनिल फुलारी, परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, युसुफ पठाण, पोलीस हवालदार राजेश नवले, संपत औचरे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, राजु वेगरे, नितीन मुंढे, अकबर शेख, शाहिद शेख, गोविंद चिवळे, पोलीस शिपाई कुसाळकर, शशिकांत नाळे, विजय पवार, ज्ञानेश्वर चित्ते यांनी केली आहे.