Home बातम्या आंतरराष्ट्रीय 13 वर्षांच्या विद्यार्थ्याशी शरीरसंबंध ठेवले, 20 वर्षांची शिक्षा

13 वर्षांच्या विद्यार्थ्याशी शरीरसंबंध ठेवले, 20 वर्षांची शिक्षा

वॉशिंग्टन :

अमेरिकेतील एरिझोनामधल्या एका शिक्षिकेला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ती ज्या वर्गात शिकवते त्याच वर्गातील 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत या शिक्षिकेने शारीरिक संबंध ठेवल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनी जोमेरा असे शिक्षिकेचे नाव असून ती विवाहित आहे.

या शिक्षिकेला सहावीतील एक विद्यार्थी आवडत होता. तिने त्याला अश्लील मॅसेज पाठवायला सुरुवात केली. तसेच अनेकदा आपल्या कारमध्ये आणि वर्गात तिने त्याच्याशी शरीरसंबंध ठेवले. या सर्व गोष्टींमुळे मुलाच्या मनावर दडपण आल्याने त्याचे वागणे बदलले. त्याच्या पालकांना संशय आल्याने त्यांनी त्याला विचारले. मात्र, त्याने कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे यामागचे कारण शोधण्यासाठी त्यांनी मुलाच्या मोबाईलमध्ये पॅरेंटल कंट्रोल हे अॅप इन्सटॉल केले. हे अॅप मोबाईलवर येणारे संशयास्पद मेसेज आणि मोबाईलमधील इतर संशयास्पद गोष्टींवर नजर ठेवते. या अॅपमुळे विद्यार्थ्याच्या पालकांना ती शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या संभाषणाची आणि शिक्षिकेकडून पाठवण्यात येणाऱ्या अश्लील मेसेजची माहिती मिळाली. त्यानंतर मुलाला विश्वासात घेऊन विचारले असता, त्याने त्यांच्यातील शरीरसंबंधाबाबत आणि शिक्षिकेकडून पाठवण्यात येणाऱ्या मॅसेजबाबतची माहिती दिली. तसेच आपण शिक्षिकेशी शरीरसंबंध ठेवल्याचे मान्य केले. त्याच्या माहितीनुसार शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करून तिला मार्च 2018 मध्ये अटक करण्यात आली.

शिक्षिकेचा गुन्हा गंभीर असल्याचे नमूद करत न्यायालयाने तिला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कारागृहातून बाहेर आल्यावर सेक्स ऑफेंडर रजिस्टरमध्ये तिचे नाव नोंदवले जाणार आहे. ‘आपण एक चांगल्या व्यक्ती आहोत. आपल्या या चुकीबद्दल आपल्याला पश्चाताप होत आहे’ असे ब्रिटनीने न्यायालयात सांगितले. आपल्यामुळे समाजाला कोणताही धोका नाही. तसेच तुरुंगात अभ्यास करून उच्चशिक्षण घेणार आहे आणि तुरुंगातून बाहेर पडल्यावर नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याचे तिने सांगितले.तिची तुरुंगात वागणूक चांगली असली तरी तिला तुरुंगातून लवकर सोडले जाणार नाही असे न्यायालयाने सांगितले आहे.