Home गुन्हा 28 मोबाइल हस्तगत दोघांना अटक

28 मोबाइल हस्तगत दोघांना अटक

0

पिंपरी : पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चार लाख 11 हजार रुपयांचे चोरीचे 28 मोबाईल हस्तगत करण्यात आले. मात्र यापैकी केवळ तीनच गुन्हे दाखल आहेत. सलमान खाजा काझी (वय 18, रा. शिवाजीवाडी, मोशी) आणि शुभम मारूती हिवरे (वय 18, रा. दिघी रोड, भोसरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी नवनाथ पोटे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली.

मात्र पोलिसांनी खाक्‍या दाखविताच आपण ठिकठिकाणी पायी मोबाईलवर बोलत चालणाऱ्या नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चार लाख 11 हजार रुपयांचे 28 मोबाइल हस्तगत केले. यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.