विशेष प्रतिनिधी, जळगांव:-
जळगाव, राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी त्यांचेमार्फत दिनांक 4 जुलै, 2020 ते 5 ऑगस्ट, 2020 या कालावधीत घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी 2020 ही परिक्षा महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोनाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वास्थ रक्षणाच्या दृष्टीकोनातून सदर परिक्षेची पुढील तारीख जाहिर करण्यात येईल. असे एमएचटी-सीईटी 2020 चे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
- Advertisement -