Home शहरे पुणे 5 कोटींची रक्कम परत मिळवण्यात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला यश

5 कोटींची रक्कम परत मिळवण्यात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला यश

0

पुणे : कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणातील 5 कोटी 73 लाख रुपये इतकी रक्कम परत मिळविण्यात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला यश आलं आहे. हॉंगकॉंगच्या हैंनसेंग बॅंकेकडून ही रक्कम कॉस्मॉस बॅंकेकडे सोमवारी जमा करण्यात आली. आर्थिक गुन्हे पोलीस उपआयुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली आहे. 2018 मध्ये पुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाला होता. हल्यात 13 कोटी रुपये गायब झाले होते. ती रक्कम परत मिळविण्यात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला यश आलं आहे.