विकासकामांच्या माहितीची गाडी आली…!

विकासकामांच्या माहितीची गाडी आली…!
- Advertisement -

अकोला, दि.10(जिमाका)- रोजच्या सारखेच अकोला रेल्वे स्थानकावर 11039 अप महाराष्ट्र एक्सप्रेसचे सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास आगमन झाले. मात्र आज आलेली रेल्वेगाडी ही काहीशी वेगळी नवे रुपडे घेऊन आली. तिचे डबे छायाचित्रांनी सजलेले होते.

गेल्या दोन वर्षातील शासनाच्या विकास कामांची माहिती आज या गाडीच्या डब्यांवर प्रदर्शित करण्यात आली होती. राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात घेतलेले महत्त्वाचे निर्णय व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेच्या डब्यांच्या बाह्य भागांवर ही माहिती लावण्यात आली आहे.कोल्हापूर-गोंदिया या सारख्या लांब पल्ल्यांच्या पाच एक्सप्रेस गाड्यांव्दारे ही माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. कोरोना काळातील उपाययोजना, आरोग्य सेवांना देण्यात आलेले प्राधान्य, शेती, क्रीडा, सामाजिक या क्षेत्रात वेगवेगळ्या आघाडीवर झालेल्या प्रगती बाबत माहिती याद्वारे मांडण्यात आली आहे. येता महिन्याभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रवासासोबत योजनांच्यामाहितीची ही पर्वणी प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण ठरली आहे.

०००

- Advertisement -