मुंबई, दि. 17 :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मंत्री तसेच मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
श्री सुधीर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मुंबईचे महापौर, विधानपरिषद सदस्य, विरोधी पक्षनेते व राज्याचे मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
0000
Governor Koshyari condoles demise of Sudhir Joshi
Mumbai, Dt. 17 :-The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has expressed grief at the demise of former Minister Sudhir Joshi. In a condolence message the Governor wrote:
“I was saddened to know about the demise of former Minister Sudhir Joshi. He was a dedicated organization man and a popular leader. He led a long struggle to secure the rights of locals and workers. Shri Sudhir Joshi created his mark as Mayor of Mumbai, Member of the State Legislative Council, Leader of the Opposition and Minister. I offer my homage to the departed leader and convey my deepest condolences to the members of the bereaved family”.
0000