Home बातम्या ऐतिहासिक मेळघाटातील आरोग्य सेवा कार्य आव्हानात्मक व प्रेरणादायी –  अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास

मेळघाटातील आरोग्य सेवा कार्य आव्हानात्मक व प्रेरणादायी –  अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास

0
मेळघाटातील आरोग्य सेवा कार्य आव्हानात्मक व प्रेरणादायी –  अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास

अमरावती, दि. 21 : मेळघाटसारख्या भागात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आव्हानात्मक कार्य करत आहेत. आरोग्य विज्ञानातील अद्ययावत ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सशक्तीकरण कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरतील. अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, असे आवाहन  सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी चिखलदरा येथे केले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मेळघाटात अतिदुर्गम भागाव सेवा पुरविणा-या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चिखलदरा येथे शुक्रवार व शनिवारी दोन दिवसीय सशक्तीकरण कार्यशाळा झाली, त्याचे उद्घाटन करताना डॉ. व्यास बोलत होते. आयुक्त डॉ. रामास्वामी एन., आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी  अविष्यांत पंडा, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. चव्हाण आदी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव डॉ. व्यास म्हणाले की, मेळघाटात दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य आरोग्य अधिकारी व कर्मचारी करत आहेत. सर्वांनी एकजुटीने व समन्वयाने कार्य करावे. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा व आरोग्य सेवेच्या संधीचा मानव सेवेसाठी सदैव वापर करावा व आरोग्य सेवा देताना येणाऱ्या अडचणींचा धीराने सामना करत अखंडित सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत विविध सत्रांत आरोग्य सुरक्षितता, माता व बाल आरोग्य या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी तयार  करण्यात आलेल्या शिक्षणपटाचे, तसेच अनुभवावर आधारित ‘सलाम तुमच्या जिद्दीला’ या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले . उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनाही यावेळी गौरविण्यात आले. आरोग्यविषयक जनजागृतीपर पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी झाले.

कार्यशाळेत मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्याबाबत उपाययोजनांबाबत स्त्री रोग तज्ज्ञांनी स्वतंत्र सत्राद्वारे मार्गदर्शन केले. तज्ज्ञ डॉ. अलका कुटे, डॉ. सुरेखा तायडे, डॉ.आरती कुलवाल, डॉ. तिवारी, डॉ. श्रीकांत जोशी, डॉ. नितीन राऊत यांनी प्रसूतीपूर्व काळजी, मातामृत्यू रोखणे, बालसंगोपन ,कमी वजनाच्या बालकांचे  व्यवस्थापन, बालकांमधील जंतूसंसर्ग रोखणे, कुपोषण रोखणे ॲनिमिया याविषयी मार्गदर्शन केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, प्राचार्य डॉ. अजय डवले, अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉ. रेवती साबळे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.विनोद करंजेकर, डॉ. प्रशांत घोडाम, विस्तार व माध्यम अधिकारी कविता पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, डॉ. संजय प्रधान व इतर अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले