Home बातम्या ऐतिहासिक कठोरा बु. सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कठोरा बु. सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
कठोरा बु. सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती, दि. 26 : प्रत्येक कार्यात सर्वांमध्ये सौहार्द कायम ठेवून व्यापक सामाजिक हिताची जोपासना ही अमरावती जिल्ह्याची संस्कृती आहे. सहकाराचे तेच तत्व आहे. या तत्वानुसार कठोरा बु. सेवा सहकारी संस्थेची होत असलेली वाटचाल आदर्श आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज कठोरा येथे केले.

कठोरा बु. सेवा सहकारी संस्थेच्या इमारत व गोडाऊनचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते कठोरा येथे झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, सुनील व-हाडे, भागवतराव खांडे, प्रकाश काळबांडे, सतीश सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी बांधव व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना प्रयत्न होत आहे. कठोरा बु. सहकारी सेवा संस्थेकडून उत्कृष्ट उपक्रम राबवले जात आहेत. सहकाराची चळवळ अधिकाधिक दृढ व्हावी. सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, लघुउद्योग आदी विविध बाबींनाही चालना मिळावी. जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

जि. प. अध्यक्ष श्री. देशमुख, श्री. काळबांडे, जि. प. माजी सभापती जयंतराव देशमुख, हरीभाऊ मोहोड, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे, अनिल कुचे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.