Home बातम्या ऐतिहासिक मुंबई महानगर प्रदेशातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा

मुंबई महानगर प्रदेशातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा

0
मुंबई महानगर प्रदेशातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा

मुंबई, दि. 9 : मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येणाऱ्या जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी देहरजी, काळू, शाई, सुर्या आणि कवडास जलसंपदा प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. देहरजी प्रकल्पाला सर्व वैधानिक मान्यता असल्याने प्रकल्पाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देता येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शाई प्रकल्पातील अडथळेही येत्या काळात सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

देहरजी प्रकल्पामुळे वसई-विरार व पालघर येथील नागरिकांना अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकेल तसेच या भागातील उद्योजकांसाठीही मुबलक पाणी पुरवठा करता येईल, असे जलसंपदा विभागाचे सहसचिव अतुल कपोले यांनी सांगितले.

बैठकीस नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम आदी उपस्थित होते.