Home बातम्या ऐतिहासिक लोककलेच्या माध्यमातून ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ जनजागृती मोहिमेची सुरुवात – महासंवाद

लोककलेच्या माध्यमातून ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ जनजागृती मोहिमेची सुरुवात – महासंवाद

0
लोककलेच्या माध्यमातून ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ जनजागृती मोहिमेची सुरुवात – महासंवाद

परभणी, दि.09(जिमाका): राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाल्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांच्यामार्फत ‘दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या मोहिमे अंतर्गत विविध कल्याणकारी योजनांची लोककलेच्या माध्यमातून जनजागृती मोहिमेची सुरुवात आजपासून झाली.

विद्यमान महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मागील दोन वर्षात राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णय आणि राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची जनसामान्यांना माहिती व्हावी तसेच याचा लाभ घेता यावा या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांच्यावतीने  लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये  ‘दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत आज जितूंर तालूक्यातील भोगाव देवी आणि आडगाव बाजार येथे लोकजागर प्रतिष्ठाण या संस्थेने आज महाविकास आघाडीच्या विविध योजनांचा पोवाडा, भारुड व नाट्यस्वरुपात जागर करत कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी लोकजागर प्रतिष्ठाण लोककला पथकाने महात्मा ज्योतिबा फूले शेतकरी‍ कर्ज मुक्त योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना पीक कर्ज बीन व्याजी देण्याची योजना, अतिवृष्टीमधील पिडीतांना मदत, कोरोना महासंकटात पिडितांना शासनामार्फत करण्यात आलेली मदत, लसीरकरण, शिवभोजन योजना, महिला सशक्तीकरण, कापसाची‍ विक्रमी खरेदी, रोजगार निर्मिती हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाला जोडणारा 94 कि.मी. द्रूतगतीमार्गामुळे जिल्ह्यातील ग्रामणी भागातील विकास, महामार्गाचा विकास, तिर्थक्षेत्रांचा विकास, अमृत आहार योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, सकार क्षेत्राचे सक्षमीकरण, नाथ जलयोजना, अनांथाना समांतर आरक्षण, स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम आरोग्य कवच विमा योजना’, बेटी बचाव बेटी पढाव, बालविवाह निर्मूलन, अल्पसंख्यांक समाजाच्या विविध योजना आदीच माहिती लोकजागर प्रतिष्ठाण या संस्थेने भारुड पोवाडा, व नाट्यस्वरुपात सादरीकरण केले.

महाविकास आघाडी सरकारने मागील दोन वर्षात जनसामान्याना केंद्रबिंदू ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्याआणि निर्णय घेतले आहेत. सरकारच्या या योजना व निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे लोककलापथक प्रभावी माध्यम असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांनी केले आहे.