Home शहरे अकोला  ‘लोककलांच्या माध्यमातून जागर’ मोहिमेत सादर झाले ६३ कार्यक्रम

 ‘लोककलांच्या माध्यमातून जागर’ मोहिमेत सादर झाले ६३ कार्यक्रम

0
 ‘लोककलांच्या माध्यमातून जागर’ मोहिमेत सादर झाले ६३ कार्यक्रम

बीड, दि. 14 (जि.मा.का.) :- राज्य शासनाच्या लोककल्याणाकारी योजना जिल्ह्यातील  सर्व तालुक्यात ‘लोककलाच्या माध्यामातून जागर’ या मोहिमेत नागरिकांना लोककलांच्या माध्यमातून व त्यांच्या बोली भाषेत समजावून सांगत जनजागृती केली जात आहे. विद्यमान राज्य सरकारची दोन वर्षपूर्तीची माहिती देतानाच शासनाच्या योजना कलापथकाच्या सादरीकरणातून जनतेपर्यंत पोहचत आहेत. जिल्ह्यात 9 मार्च पासून सुरू असलेल्या या मोहिमेत आजपर्यत 63 कार्यक्रम सादर झाले आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये 10 कार्यक्रम सादर करण्यात आले.

यामध्ये जय भवानी कलापथकाच्या माध्यमातून वडवणी तालुक्यातील चिंचाळा, बाहेगव्हाण आणि वडवणी शहरात कार्यक्रम झाले तसेच समता कलापथकाने आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट, धामणगाव व आष्टी या ठिकाणी कार्यक्रम सादर केले तर तांबवेश्वर कलापथकाने पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही, महासांगवी, पाटोदा व तांबाराजुरी येथे कार्यक्रम सादर केले.

माहिती व जनसपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय बीडमार्फत 9 मार्च  पासून  कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. महाविकास आघाडी शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लोकाभिमूख शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये कलापथक विविध भागात काम करत आहे. या कलापथकांनी तालुक्यातील येथील बाजारपेठ तसेच वर्दळीच्या ठिकाणी कलेच्या माध्यामातून शासकीय योजना उपक्रम हे स्थानिकापर्यंत पोहचविले आहे.

जनजागृती मोहिमेत काल जवळपास 11 कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये जयभवानी कला पथकाचे अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडे, चनई येथील कार्यक्रम धारुर तालुक्यातील कारी व वडवणी तालुक्यातील कुपा येथे कार्यक्रम झाले. समता कला पथकाचे आष्टी तालुक्यातील हातोळा, कापसी, गरजेवाडी, डोईठाणा येथे तर तांबवेश्वर कलापथकाने पाटोदा तालुक्यातील भायाळ, सोनी सावरगाव, थेरला येथे कार्यक्रम सादर केले होते. या मोहिमेत 3 कलापथकांच्या जवळपास 30 कलाकार व सहकाऱ्यांच्या सहभागाने आजपर्यत 63  कार्यक्रम सादर झाले आहेत. या मोहिमेसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदिप क्षीरसागर, आमदार संजय दौड तसेच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह गावातील विविध सरपंचांचे देखील सहकार्य आणि मान्यवरांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत.