Home शहरे अकोला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैध मापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक डॉ.ललित हारोडे यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैध मापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक डॉ.ललित हारोडे यांची मुलाखत

0
‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैध मापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक डॉ.ललित हारोडे यांची मुलाखत

मुंबई, दि. 15 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात वैध मापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक डॉ.ललित हारोडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि.16 मार्च व गुरूवार दि. 17 मार्च 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

15 मार्च या जागतिक ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या मुलाखतीत वैध मापनशास्त्र विभागाचे कार्य, वजन मापासंदर्भात ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्याचे निराकरण कशाप्रकारे करण्यात येते, ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी, बाजारातून कुठलीही पॅकींग असलेली वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी, ग्राहकांना असलेले अधिकार, मापांबाबत असलेल्या तक्रारी कोठे करायच्या आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. ललित हारोडे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

00000