Home बातम्या ऐतिहासिक लॉन टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत ‘मावज’चे राजाराम देवकर यांना रौप्य; महासंचालक दीपक कपूर यांचेकडून कौतुक 

लॉन टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत ‘मावज’चे राजाराम देवकर यांना रौप्य; महासंचालक दीपक कपूर यांचेकडून कौतुक 

0
लॉन टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत ‘मावज’चे राजाराम देवकर यांना रौप्य; महासंचालक दीपक कपूर यांचेकडून कौतुक 

मुंबई, दि. 17 : चंदिगड येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा लॉन टेनिस स्पर्धेत राजाराम देवकर यांनी रौप्य पदक पटकावल्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

लॉन टेनिसच्या राष्ट्रीय स्पर्धेत माझ्या विभागाच्या कर्मचाऱ्याने रौप्य पदक पटकावल्याने आपल्याला अत्यंत आनंद झाला आहे अशा शब्दांत कौतुक करत महासंचालक श्री. कपूर यांनी टेनिसपटू श्री. देवकर यांना क्रीडा क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री. देवकर हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील प्रकाशने शाखेत उपसंपादक म्हणून कार्यरत असून त्यांनी कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळत छंद जोपासत राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावले आहे. त्यांनी यापूर्वीही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व करून राज्याला पदक मिळवून दिले आहे.

नवी दिल्ली येथील केंद्रीय नागरी सेवा सांस्कृतिक व क्रीडा मंडळांतर्गत चंदिगड प्रशासनाच्या क्रीडा विभागातर्फे 7 ते 14 मार्च 2022 दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून विभागीय क्रीडा मंडळे, केंद्रशासित प्रदेश व राज्यांचे 250 हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत खुल्या दुहेरी गटात श्री. देवकर यांनी राजीव गरकल यांच्या साथीने रौप्य पदकाची कमाई करून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.