Home बातम्या ऐतिहासिक गादा येथील जिल्हा क्रीडा संकुलाची क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी – महासंवाद

गादा येथील जिल्हा क्रीडा संकुलाची क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी – महासंवाद

0
गादा येथील जिल्हा क्रीडा संकुलाची क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी – महासंवाद

नागपूर, दि. 1 :गादा येथे बांधण्यात आलेले जिल्हा क्रीडा संकुल सर्वसामान्य खेळाडूंसाठी सोयीचे व्हावे, यासाठी हे संकुल एनसीसी कॅम्पसाठी करार तत्वावर देण्याचे  पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सूचविले आहे. या प्रकल्पाचे रखडलेले सर्व कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कामठी तालुक्यातील गादा येथे जिल्हा परिषदेच्या 19 एकर जमिनीवर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. संकुलाच्या बांधकामाची पाहणी सुनील केदार यांनी  आज केली. त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा मंत्र्यांच्या पुढाकारात या संकुलासाठी एकूण तरतूद 15 कोटीची झाली आहे. 8 कोटी प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, अवंतिका लेकुरवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, क्रीडा  विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, शब्बीर भाई, तहसीलदार  अक्षय पोयाम, उपअभियंता श्री. बांधवकर जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य, एनसीसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सावनेर तालुका क्रीडा संकुलाप्रमाणे हे जिल्हा क्रीडा संकुल करार तत्वावर एनसीसी कॅम्पला देण्यात येणार असल्याचे त्यांनी  सांगितले. एनसीसी कॅम्पमध्ये 600 कडेट राहणार असून त्यासाठी सर्वसुविधायुक्त संकुल तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या परिसरात फायरिंग रेंजची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची योग्य उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.

कामठी हे राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळाडूसाठी प्रसिध्द शहर असून तेथील क्रीडा संकुल परिसरात लवकर फुटबॉलचे मैदान तयार करण्यात येणार आहे. 10 कोटी मंजूर तरतुदींपैकी दीड कोटीचा निधी यासाठी प्राप्त आहे.त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही श्री. केदार म्हणाले.

या संकुलासाठी शासनाकडून 8 कोटी मंजूर झाले असून त्याअंतर्गत बॅटमिंटन, हॉकी मैदान तयार करण्यात आले असून संकुलाचे कुंपन बांधण्यात आले आहे. उर्वरित काम लवकरच करण्यात येईल, असे श्री. बांधवकर यांनी सांगितले.

या संकुलाच्या बांधकामासाठी 8 लाख रुपये निधी मिळाला असून संकुलाच्या सर्व सुविधाकरीता तसेच अद्ययावतीकरणासाठी अजून 2 कोटी 29 लाख अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी नागपूर ग्रामीणसाठी स्वतंत्र्य क्रीडा असोशिएशन स्थापना करण्याची विनंती क्रीडा मंत्र्यांना केली.

                                                                                                                     00000