Home गुन्हा विक्रोळी ; धारदार शस्त्राने एकाचा खून

विक्रोळी ; धारदार शस्त्राने एकाचा खून

0

विक्रोळी- प्रतिनिधी : शफीक शेख

दि. ०३/०८/१९ रोजी सुमारे २२.३० वा. इसम नामे तेजराम
डिलीव्हरी बाॅय, हाॅटेल रेड चिली, विक्रोळी पूर्व यास प्रविण हाॅटेल जवळील भुयारी मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी येथे दोन अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने डाव्या व उजव्या कुशीत भोसकून गंभीर जखमी केले.
जखमीस तातडीने डाॅ. आंबेडकर रूग्णालयात नेले असता, त्यास डाॅक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले.
सदर बाबत विक्रोळी पोलिस ठाणे येथे दोन अनोळखी आरोपींच्या विरुद्ध गु.नों.क्र. ३१३/१९, क. ३०२, ३४ भा.दं.वि. प्रमाणे दाखल करून तपास सुरु केला आहे.