लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक हे भारताचे दोन रत्न :- प्रा.जाधव

- Advertisement -

माजलगांव:-(तालुका)
यशवंत विद्यालय,माजलगांव येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा.सौ.जाधव मॅडम या बोलत होत्या. बोलताना त्यापुढे म्हणाल्या की,भारत हा देश रत्नांचा देश आहे.या रत्नामधले सर्वात महान रत्न म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक होय.या दोन्ही रत्नांनी आपल्या जीवनामध्ये सतत संघर्ष करून सामान्य लोकांना सन्मानाने जगण्याची सवय लागली. या दोन्ही रत्नांचे चरित्र आपण अभ्यासले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक केदार सर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पुजनाने झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधुरी केचाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुजा बुगूलवार यांनी केले.

- Advertisement -