Home शहरे अकोला कोच्छी पुनर्वसन प्रकल्पाची कामे मे अखेर पर्यंत पुर्ण करावीत – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

कोच्छी पुनर्वसन प्रकल्पाची कामे मे अखेर पर्यंत पुर्ण करावीत – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

0
कोच्छी पुनर्वसन प्रकल्पाची कामे मे अखेर पर्यंत पुर्ण करावीत – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

नागपूर दि.16 : जिल्ह‌्यातील कोच्छी प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकासक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, कार्यकारी अभियंता सयाम, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत कोच्छी पुनर्वसनबाबत सुरु असलेल्या प्रकल्पातील कामाच्या स्थितीबाबत, पाटणसावंगी येथील नदी वळण संदर्भात, सावनेर व कळमेश्वर येथील कालवा दुरुस्तीबाबत, बिड-चिचघाट बंधारे तसेच खेकरा नाला सौंदर्यीकरणबाबतचा आढावा घेण्यात आला.

प्रकल्पाची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन करुन या प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी श्री. केदार यांनी दिले.    

पुनर्वसन नवीन गावठाण्यासाठी सुविधा निर्माण करण्याची कामे तसेच कालवे प्रणालीचा विस्तार व सुधारणा यांची कामेही प्रगतीपथवर आहेत अशी माहिती श्रीमती बनकर यांनी दिली.

पुनर्वसनाचे कार्य दीर्घकाल सुरु असते. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादा निश्चित करुन प्रत्येक प्रकल्पाचे ‘टाईम ऑडीट’ झाले पाहिजे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.