Home ताज्या बातम्या पुणे जिल्हा : .म्हणूनच लाखो मतांच्या फरकाने निवडून येतात ‘अजित पवार’

पुणे जिल्हा : .म्हणूनच लाखो मतांच्या फरकाने निवडून येतात ‘अजित पवार’

0
पुणे जिल्हा : .म्हणूनच लाखो मतांच्या फरकाने निवडून येतात ‘अजित पवार’

त्यांच्या जनता दरबारातून येथे प्रचिती
दिगंबर पडकर
जळोची – 
राज्याच्या राजकारणातील उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. राज्याच्या राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान त्यांची प्रशासनावरील असणारी पकड वाखाणण्या जोगी आहे.

आपल्या मतदार संघातील नागरिकांची विविध कामे व समस्यांचा निपटारा जागच्या जागेवर करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.आपल्या मतदार संघातील नागरिकांना त्यांची कामे घेऊन पुणे मुंबई सारख्या ठिकाणी यावे लागू नये म्हणून मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत जनता दरबार घेत असतात. मागील काही दिवस बंद असलेला जनता दरबार आज सुरू झाला असून, असंख्य नागरिक आपली कामे घेऊन जनता दरबारात दाखल झाली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज (रविवार दि.17) बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमी बरोबरच अधिवेशन चालू असल्याने मागील काही दिवसांपासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आज तो पुन्हा भरवण्यात आला आहे. अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.

या जनता दरबारात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच महिला पुरुष व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने आपली कामे घेऊन पवार यांच्या दरबारात येत असतात आपल्या मतदार संघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुणे- मुंबईत भेटायला येऊ लागू नये, म्हणून अजित पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व विभागातील शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो. नागरीकांचे ज्या विभागाकडे काम आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ते नागरिकांचे निवेदन देतात आणि तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. दरबारात येणाऱ्या शेवटच्या नागरिकाचे निवेदन घेऊन त्यावर कार्यवाही करेपर्यंत दरबार सुरू राहतो.

विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी बारामती दौऱ्यावर असतात. त्यावेळी ते अनेक कार्यक्रम पार पाडत असतात मात्र यावेळी देखील अनेक नागरिक आपली कामे घेऊन पवार यांच्याकडे येत असतात. चालू कार्यक्रमातही प्रत्येकाचे निवेदन घेऊन स्वतः वाचून संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्या निवेदनाचा निपटारा जागच्या जागेवर करतात.

मतदार संघातील अनेक नागरिक या जनता दरबाराला मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या जनता दरबारात विद्यार्थी महिला, पुरुष, वयोवृद्ध, अपंग आधी आपले कामे घेऊन येतात. कामे तात्काळ होत असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. या जनता दरबारात आलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांची ही आस्थेने पवार विचारपूस करत असतात. म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीवेळी प्रत्यक्ष प्रचाराला येण्याची गरज भासत नाही. उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ व प्रचाराची सांगता सभा घेतात. मतदार संघातील प्रत्येक पदाधिकारी व सामान्य नागरिक स्वतः उमेदवार म्हणूनच अजित पवारांचा प्रचार करतात.म्हणूनच अजित पवार स्वतः प्रचाराला न उतरता ही त्यांना लाखोंच्या मतांनी नागरिक निवडून देतात..