उस्मानाबाद.दि.18(जिमाका) :- केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज येथील स्त्री रुग्णालयास भेट देऊन येथील आरोग्य विषयक सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार राणा जगजीतसिंह पाटील,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के पाटील आदी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान रुग्णालयात वर्षभरामध्ये किती महिलांच्या प्रसूती झाल्या, किती मुला-मुलींचा जन्म झाला, यासोबतच किती खाटा उपलब्ध आहेत, दररोज किती महिला रुग्ण रुग्णालयात भरती होतात, कोणकोणत्या सोयी उपलब्ध आहेत, इमारत कशी आहे, खाटा व्यवस्थित आहेत की नाही, महिला रुग्णांना कोणत्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात, भोजनाचा दर्जा कसा आहे, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिका, डॉक्टरांचे संख्याबळ पुरेशे आहे किंवा नाही, आदींबाबत निरीक्षण केले.यावेळी डॉ.पवार यांच्या हस्ते नवजात बालकांचे आधार कार्ड नोंदणीची सुरुवात करण्यात आली. तसेच त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांशी संवाद साधला आणि विचारपूसही केली.
- अकोला
- अमरावती
- अहमदनगर
- उस्मानाबाद
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- गोंदिया
- गोवा
- जळगाव
- धुळे
- नागपूर
- नाशिक
- परभणी
- पुणे
- पोलीस घडामोडी
- बीड
- मुंबई
- राजकारण
- राष्ट्रीय
- लातूर
- शहरे
- सांगली
- सातारा
- सोलापूर