Home शहरे अकोला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

0
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १९ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्याबाबत आयोजित बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे प्रकल्प संचालक मल्लीकार्जुन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील नागरिक यावेळी बैठकीला उपस्थित होते.

राज्यमंत्री  श्री.भरणे म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शौचालय, पाणी, वीज या मांडलेल्या समस्यांबाबत वन विभाग व रहिवाशी दोघांची बाजू ऐकून योग्य त्या निर्णयासाठी  सर्वोतोपरी सहकार्याची भूमिका राहील असे मत राज्यमंत्री श्री. भरणे यांनी बैठकीत व्यक्त केले.

माजी आमदार विद्या चव्हाण यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या समस्या बैठकीत मांडल्या.