Home शहरे अकोला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

0
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. 20 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उदगीर येथे होणाऱ्या  95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 21 एप्रिल, शक्रवार दि. 22 एप्रिल  व शनिवार दि. 23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मराठी साहित्य, त्याची दिशा, समाजमनावर होणारा साहित्याचा परिणाम याबरोबरच श्री. सासणे यांचा लेखनप्रवास याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून  दिली आहे.

००००