कोल्हापूर दि. 22 :- कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी शासनाच्या प्रदत्त समितीने 212 कोटीच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली असून विमानतळ विस्तारीकरणाबतची कामे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक दृष्टिने काम करण्याची सूचना करुन प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे या कामाची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाराष्ट्र विमानतळ कंपनीचे अपर जिल्हाधिकारी दिपक नलवडे, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, विमानतळ विस्तारीकरणासाठी केलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन ही प्रकरणे जलदगतीने निर्गत करावीत. विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये असणारी दुकाने, आस्थापना, औद्योगिक कारखाने, शेती बाबत योग्य तो निर्णय घ्यावा. विमानतळ विस्तारीकरण कामात कोणतीही समस्या उदभवणार नाही याकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये 7 कारखाने असल्याचे बैठकीत सांगण्यात आले असता या कारखानदारांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत एमआयडीसीने कार्यवाही करावी.
विमानतळ विस्तारीकरण हद्दीमधील एचटी लाईन स्थलांतर करण्याचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नेर्ली-तामगाव रस्त्यास पर्यायी रस्ता, लक्ष्मीवाडीचे पुनर्वसन करण्याबाबतही आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. विमानतळ विस्तारीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाय योजना करुन ही कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे.
रात्रीच्या वेळी विमान उड्डान सुविधेबाबतचा अहवाल 30 एप्रिल पर्यंत पाठविण्यात येणार असून 1300 मीटर रनवे वरुन ही सुविधा उपलब्ध होणार आहे. एचटी लाईन स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 1900 मीटर रनवे वरुन ही सुविधा उपलब्ध होईल, तसेच टर्मीनल इमारत लवकर पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल,असे बैठकीत सांगण्यात आले.
000
- अकोला
- अमरावती
- अहमदनगर
- उस्मानाबाद
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- गोंदिया
- गोवा
- जळगाव
- धुळे
- नागपूर
- नाशिक
- परभणी
- पुणे
- पोलीस घडामोडी
- बीड
- मुंबई
- राजकारण
- राष्ट्रीय
- लातूर
- शहरे
- सांगली
- सातारा
- सोलापूर