मुंबई, दि. 24 : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, तीन्ही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांना यावेळी निरोप दिला.
००००