मुंबई, दि. 25 :- “माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले साहेबांच्या निधनानं महाराष्ट्रानं कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. सामाजिक, आर्थिक प्रश्नांचा सखोल अभ्यास असलेलं, राजकीय नेतृत्वाला अचूक, स्पष्ट सल्ला देणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री असताना त्यांचे सचिव तसंच आदरणीय शरद पवार साहेबांसोबतही डॉ. गोडबोले यांनी काम केलं होतं. राज्य व केंद्राच्या सेवेत प्रदीर्घ सेवा करताना अनेक महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. कर्तव्यदक्ष अधिकारी, सिद्धहस्त लेखक, संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून डॉ. माधव गोडबोले साहेब कायम स्मरणात राहतील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.