मुंबई, दि. 25 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते व क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत राज्य पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे प्रमाणपत्र वितरण सोहळा होवू शकला नव्हता.यावर्षी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्यसंस्थेतर्फे दि. २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.३० वा.राज्य प्रशिक्षण केंद्र स्काऊट गाईड पॅव्हिलियन, शिवाजी पार्क, दादर (प) मुंबई येथे राज्यस्तरीय राज्यपुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान समारंभ होणार आहे.