Home बातम्या ऐतिहासिक राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक; पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून गौरव – महासंवाद

राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक; पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून गौरव – महासंवाद

0
राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक; पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून गौरव – महासंवाद

अमरावती, दि. 25 : अखिल भारतीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत राज्य राखीव पोलीस दलाच्या अमरावती गटाचे समादेशक हर्ष पोद्दार यांना देशात प्रथम क्रमांक मिळून सुवर्णपदक प्राप्त झाले. या यशाबद्दल पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते श्री. पोद्दार यांना गौरविण्यात आले.

श्री. पोद्दार यांची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी महाराष्ट्र पोलीस दलासाठी व संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी श्री. पोद्दार यांचा गौरव केला. राष्ट्रीय अश्वारोहण स्पर्धेत सहभागासाठी श्री. पोद्दार यांनी मुंबई पोलीस दलाकडील घोडा वापरला. अश्वारोहणातील कौशल्याने त्यांना संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळाला.

राज्य राखीव पोलीस दलाच्या अमरावती गटातर्फे कोविड-19 च्या दुस-या लाटेत जिवितहानी टाळण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे या लाटेत हानी टळली. या नियोजन व कामगिरीबाबत प्रबंधवजा अहवाल श्री. पोद्दार यांनी भोपाळ येथील अखिल भारतीय पोलीस सायन्स काँग्रेसमध्ये सादर केला.  गटाचा हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर ‘बेस्ट प्रॅक्टिस’ म्हणून स्वीकारण्यात आला.

000