Home शहरे अकोला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ.हेमंत वसेकर यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ.हेमंत वसेकर यांची मुलाखत

0
‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ.हेमंत वसेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 27 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर  यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 28 एप्रिल, शुक्रवार 29 एप्रिल व शनिवार 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्राचे नागरिकीकरण खूप वेगात होत असले तरी आजही 55 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राज्याच्या ग्रामीण भागात राहते. शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या उद्योगांतूनच या लोकसंख्येला प्रामुख्याने रोजगार मिळतो. ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षम करण्याबरोबरच या लोकसंख्येचे जीवनमान अधिक समृद्ध करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे कार्य, त्याचा उद्देश आणि त्यातून होत असलेल्या बदलांबाबत सविस्तर माहिती डॉ. हेमंत वसेकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून  दिली आहे.

००००